DY Chandrachud News : ड्रायव्हरच्या एकुलत्या एक मुलीचा संदर्भ देत चंद्रचूड म्हणाले, दुनिया बदल रही है!

cji dy chandrachud tells about his drivers daughter and family during same sex marriage hearing
cji dy chandrachud tells about his drivers daughter and family during same sex marriage hearing

समलैंगिक विवाहांना मान्यता मिळावी यासाठीच्या याचिकांवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान चीफ जस्टीस डीवाय चंद्रचूड यांनी त्यांच्या ड्रायव्हर बद्दल एक महत्वाची बाब सांगितली. नेमकं सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले वाचा सविस्तर..

देशात समलैंगिक विवाहाना मान्याता देण्याला विरोध होत असताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सध्या जग बदलत असल्याचे वक्तव्य केलं. चंद्रचूड हे त्यांच्या ड्रायव्हरचा उल्लेख करत म्हणाले की, चीन सारख्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग कमी होत आहे. याचे कारण लोक कमी मुलं जन्माला घालत आहेत.

तुम्ही तुमच्या जवळपासच्या लोकांशी बोलून पाहा, जे तुमच्यासाठी काम करतात. ते एका अपत्याविषयीच बोलतील. माझ्या ड्रायव्हरला देखील एकच मुलगी आहे. सध्या मुलगा असावा ही इच्छा देखील कमी होताना दिसत आहे. कारण लोक आता सुशिक्षीत होत आहेत.

cji dy chandrachud tells about his drivers daughter and family during same sex marriage hearing
Viral Wedding Card : लग्नाची ३६ पानी लग्नपत्रिका व्हायरल; इतकं लिहीलंय तरी काय, जाणून घ्या

यानंतर चंद्रचूड यांनी बेंचवरील दुसऱ्या न्यायाधीशांकडे इशारा करत म्हटले की, तुम्ही तर माझ्या ड्रायव्हरला ओळखताच. इतकेच नाही तर समलैंगिक पालकांद्वारे मुले वाढवण्यावर प्रश्ना उपस्थित होताच त्यांनी यावर देखील उत्तर दिलं. ते म्हणाले की जेव्हा विषम लिंग असणाऱ्या जोडप्यांमध्ये जेव्हा हिंसाचार होतो तेव्हा त्यावर काय सांगाल?

चंद्रचूड पुढे बोलताना म्हणाले की, जर एकाद्या मुलाचे वडिल रात्री दारू पिऊन आले आणि त्याच्या आईवर हल्ला करतात, तसेच दारू पिण्याकरीता पैसे मागतात तर त्यावर काय बोलणार? चंद्रचूड यांनी समलैंगिक विवाहांना होत असलेला विरोधाचा विचार हा एकाद्या ट्रोल्सप्रमाणे असल्याचे म्हटले.

cji dy chandrachud tells about his drivers daughter and family during same sex marriage hearing
Starship Rocket Explodes : जगातील सर्वात मोठ्या रॉकेटचा प्रक्षेपणानंतर हवेत स्फोट; Video होतोय व्हायरल

समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, समलैंगिक संबंध हे एकवेळचे नाते नाही, आता हे संबंध कायमचे राहणार आहेत. हे केवळ शारीरिकच नाही तर ते एक भावनिक मिलन देखील आहे. अशा परिस्थितीत समलिंगी विवाहासाठी 69 वर्षे जुन्या विशेष विवाह कायद्याची व्याप्ती वाढवणे चुकीचे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com