

cji suryakant
esakal
नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नावाने सोशल मीडियावर एका बनावट आणि अत्यंत द्वेषपूर्ण विधानाचा प्रसार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने सरन्यायाधीश नाराज झाले असून, त्यांनी अशा कृत्यांचा कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, ही केवळ खोटी माहिती पसरवण्याची घटना नाही तर सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे.