

CJI Surya Kant
esakal
नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपल्या कारकिर्दीतील एका महत्वाच्या घटनेची आठवण सांगितली. न्यायिक सेवेत प्रवेश करण्याची आपली इच्छा असतानाही एका वरिष्ठ न्यायाधीशांच्या सल्ल्यामुळे वकिली प्रोफेशन स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांनी दिल्ली न्यायिक सेवा परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची मागणी करणाऱ्या वकील प्रेरणा गुप्ता यांची याचिका फेटाळून लावली.