

Supreme Court Hearing on Jantar Mantar Case
esakal
नवी दिल्ली : जंतर मंतरवरील आंदोलन आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी गोंधळ झाल्याचा आरोप समोर आला आहे. ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी सुनावणी प्रक्रियेत वारंवार अडथळे आणले जात असल्याचे सांगत या प्रकरणांमधून माघार घेतली आहे. सुनावणीदरम्यान आपला मायक्रोफोन हिसकावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेमुळे न्यायालयातील शिस्त आणि कामकाजाच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.