

CJI Suryakant
esakal
भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी तरुण वकिलांना एक प्रेरणादायी आणि अनोखा संदेश दिला. मंगळवारी राजीव गांधी राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या (RGNUL) सातव्या दीक्षांत समारंभात बोलताना त्यांनी तरुण वकिलांना आवाहन केले की ते स्वतःला फक्त 'केस बिल्डर' न मानता 'राष्ट्र बिल्डर' मानले पाहिजेत. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की भारतासारख्या देशात वकिलाची भूमिका काय आहे आणि ती काय असावी.