CJI लळीत ॲक्शनमोडमध्ये! चार दिवसांत 1800हून अधिक प्रकरणं काढली निकाली

सरचिटणीसांनी माझ्यासमोर खटल्यांचे आकडे ठेवले आहेत
CJI
CJIesakal

न्यायमूर्ती उदय लळीत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भारताच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. ते CJI झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फक्त चार दिवसांत 1800 हून अधिक खटले निकाली काढले आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात सरन्यायाधीश लळीत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या कामगिरीची माहिती दिली. ते वकीलांशी बोलताना म्हणाले की गेल्या चार दिवसात घडलेली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे.

आपण ज्या प्रकरणांची यादी करत आहोत, ते मी पदावर येण्यापूर्वीच्या प्रकरणांच्या तुलनेत खूप जास्त आहेत. माझ्या सरचिटणीसांनी माझ्यासमोर खटल्यांचे आकडे ठेवले आहेत. गेल्या चार दिवसांत न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणांची एकूण संख्या 1293 होती. 1293 पैकी 493 प्रकरणे 29 ऑगस्ट रोजी निकाली काढण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात सीजेआय म्हणून लळीत यांचा हा पहिला दिवस होता. यानंतर शुक्रवारी 315 निकाल सुनावण्यात आले.

तर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आणि गुरुवारी 197 आणि 228 प्रकरणे निकाली काढली. भाषणादरम्यान न्यायमूर्ती लळीत यांनी सर्वोच्च न्यायालय नियमीत सुनावणीच्या 106 प्रकरणांचा दोन दिवसांत निर्णय घेऊ शकते. तीन न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणीची प्रकरणे ज्यांना एकतर विस्तृत युक्तिवादाची आवश्यकता असते, किंवा सूचीबद्ध न करता अनेक दशकांपासून स्थगिती दिली जाते.

CJI
INS Vikrant: नौदलात दाखल होताच मोदींचं उर भरून येणारं ट्विट

मंगळवार ते गुरुवार या काळात नियमित सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणांची यादी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आली आहे. अशा 58 प्रकरणांवर मंगळवारी निर्णय झाला, तर 48 प्रकरणे गुरुवारी निकाली काढण्यात आली. सरन्यायाधीश लळीत म्हणाले, "आपण कल्पना करू शकता की न्यायालये आता नियमित खटले निकाली काढण्यावर अधिक भर देत आहेत." न्यायालयाने सोमवार पासून 440 याचिकाही निकाली काढल्या.

मंगळवार आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणात हस्तांतरण याचिकांवर निकाल देण्यात आला. न्यायमूर्ती लळीत म्हणाले की सर्वोच्च न्यायालय शक्य तितके खटले निकाली करण्याचा प्रयत्न करेल आणि सीजेआय म्हणून 74 दिवसांच्या आपल्या अल्प कार्यकाळात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.

ते म्हणाले, "जेव्हा मी पदभार स्वीकारला, तेव्हा प्रत्येक डोळे मला एकच गोष्ट सांगत होते. 'साहेब, आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहेत. ' मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. जास्तीत जास्त खटले निकाली निघावेत यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करेल.

अधिकाधिक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात पोहोचावीत आणि हा संदेश प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवावा. 27 ऑगस्ट रोजी 49 व्या CJI म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत, न्यायमूर्ती UU लळित यांनी मान्य केले की विविध स्तरांवर प्रलंबित प्रकरणे (सुमारे 71,000) हाताळण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com