

Thousands of Police Deployed and Monitored via Drones in Connaught Place Central Park Area; Police Ban on March
Sakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या संघर्षात पुन्हा एकदा मोठे नाट्य रंगले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी कॅनॉट प्लेस येथे पुकारलेला ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चा सुरू होण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी दिल्ली पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. या अनपेक्षित आणि वेगवान कारवाईमुळे कॅनॉट प्लेस परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.