clash broke out between Police and Congress workers in Assam Guwahati Bharat Jodo Nyay Yatra
clash broke out between Police and Congress workers in Assam Guwahati Bharat Jodo Nyay Yatra

Video : राहुल गांधींसमोरच भिडले कार्यकर्ते अन् पोलीस! काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान गदारोळ

आसाममधील गुवाहाटी येथे पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली आहे.
Published on

Bharat Jodo Nyay Yatra News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत गदारोळ झाला आहे. आसाममधील गुवाहाटी येथे पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून राहुल गांधी यांच्यासमोरच काँग्रेस कार्यकर्ते आणि आसाम पोलीस भिडल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममधील गुवाहाटीमध्ये पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. शहरात यात्रेला परवानगी न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

शहरात यात्रेला परवानगी नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर राहुल गांधींची यात्रा शहराच्या आत येत होती. यामुळेच पोलिसांनी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. दरम्यान राहुल गांधींच्या यात्रेसोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

clash broke out between Police and Congress workers in Assam Guwahati Bharat Jodo Nyay Yatra
Ram Mandir : जगभरात श्रीरामाचा जयघोष! सुमारे 40 देशात साजरा झाला आनंदोत्सव

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा आज आसामच्या गुवाहाटी येथे पोहचली आहे. दरम्यान आसाम पोलिसांनी गुवाहाटीमधील यात्रेचा एंट्री पॉइंट असलेल्या खानापारा येथे कडक सुरक्षा व्यवस्था तसेच बॅरिकेडिंग केले होते. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

एक्सवर भारत जोडो न्याय यात्रेच्या अधिकृत हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आसाममधील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. तसेच काँग्रेस दुपारी 1.20 वाजता पत्रकार परिषदही घेणार आहे.

दरम्यान 14 जानेवारी रोजी मणिपूर येथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 21 मार्च रोजी मुंबईत संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com