

Class 10 pre-exam paper leak bealgaum
esakal
SSC Paper Leak News : दहावीच्या शनिवारी झालेल्या पूर्व परीक्षेचा समाज विज्ञान विषयाचा पेपर बेळगाव गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एका शाळेत प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच सोशल मीडियावर समाज विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याबद्दलची चौकशी शिक्षण खात्याने सुरू केली आहे.