Sikkim Flood : सिक्कीममधील पुरामागचं मुख्य कारण आलं समोर; शास्त्रज्ञांचा 'या' राज्यांनाही गंभीर इशारा

Sikkim Flood
Sikkim Flood

सिक्किममध्ये काही दिवसांपू्र्वी आलेल्या भीषण पुराचे मुख्य कारण हे तापमान वाढ, ग्लेशियर वितळणे, मोठ्या प्रमाणात होणारा पाऊस, अनियंत्रीत पद्धतीने केलेली बांधकामे आणि प्रदुषण असल्याची बाब समोर आली आहे. वेगाने होत असलेला हवामान बदल हे या आपत्तीमागचे सर्वात मोठे कारण असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हिमालयातील हि सरोवरांची संख्या वाढल्याने अशी आणखी संकटे येऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

या महिन्याच्या सुरूवातीलाच सिक्किम येथे अचानक पूर आल्याने हजारो लोक विस्थापीत झाले होते, या पुरांमध्ये अनेक घरांचे नुकसान होऊन बऱ्याच लोकांना जीव देखील गमवावा लागला होता.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरसह अन्य हिमालयाच्या प्रदेशातील राज्यांमध्ये देखील हा धोका उद्भवू शकतो. हिमसरोवर वितळल्याने येणारा पूर (Glacial lake outburst flood) हा मोराइन धरणांच्या अपयशामुळे आल्याचे देखील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Sikkim Flood
Ajit Pawar : ''मनोज पाटलांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आम्ही सकारात्मक, पण...'' अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

पर्यावरण विशेषज्ञ अंजल प्रकाश यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचा धोका असलेल्या प्रदेशांमध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे. जागतीक तापमानवाढीमुळे बर्फ वितळून हिमसरोवरांचा आकार वाढत आहेत.

तसेच जीएलओएफचे मुख्य कारण हे ग्लेशियर वेगाने वितळणे असल्याचे सांगितले जाते आणि ग्लेशियर वितळणे हा मानवनिर्मीत प्रदुषण आणि अनियंत्रीत बांधकामे यामुळे होणाऱ्या तापमान वाढीचा परिणाम आहे. भूकंप आणि ब्लॅक कार्बन उत्सर्जन अशा कारणामुळे देखील जीएलओएफचा धोका वाढतो.

Sikkim Flood
Israel-Hamas War: रस्त्यावर गाड्या थांबवून बेछूट गोळीबार, इस्राइलवरील हमासच्या पहिल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com