अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी! १० जणांचा मृत्यू - NDRF | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amarnath Yatra2

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी! १० जणांचा मृत्यू - NDRF

नवी दिल्ली : हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या अमरनाथ पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १० जणांचे मृतदेह हाती आले आहेत तर तीन जणांचा वाचवण्यात यश आलं आहे. या ढगफुटीमुळं सध्या सुरु असलेल्या अमरनाथ यात्रेवर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. (Cloud Burst near Amarnath cave Yatra may adjournt)

अमरनाथ यात्रेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढफुटी झाली. या गुहेजवळ सध्या १० ते १२ हजार भाविक असल्याची माहिती मिळते आहे. ढगफुटीचे काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आले आहेत. यामध्ये NDRF, SDRF आणि इतर एजन्सीच्या माध्यमातून बचावकार्य राबवण्यात येत आहे, अशी माहिती आयटीबीपीनं दिली.

ढगफुटीमुळं पाण्याचा प्रवाह गुहेजवळूनच गेला असून यामुळं काही लंगरचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. काही भाविकही याच्या तडाख्यात सापडल्याचं सांगितलं जात आहे. पण पुढील काही वेळात याबाबत अधिक माहिती समोर येईल.

Web Title: Cloud Burst Near Amarnath Cave Yatra May Adjournt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh newsAmarnath cave