उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; देवप्रयागमधील घरे, दुकाने गेली वाहून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cloudburst In Uttarakhand

उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; देवप्रयागमधील घरे, दुकाने गेली वाहून

नवी दिल्ली (Cloudburst In Uttarakhand )- नवी टिहरीमध्ये दशरथ पर्वतावर ढग फुटीची घटना घडली. शांता नदीमध्ये आलेल्या पुरामुळे देवप्रयागच्या (Devprayag) शांतिबाजारचे मोठे नुकसान झाले आहे. आयटीआयची तीन मजली इमारत उद्धवस्त झाली आहे. शांता नदीला लागून असलेली अनेक दुकाने वाहून गेली आहेत. देवप्रयाग नगरमधून बस स्थानकाकडे जाणारा रस्ता आणि एक पूल उद्धवस्त झालाय. यात कोणी जमखी झाल्याची माहिती अजून मिळाली नाही. कोरोना कर्फ्युमुळे आयटीआयसह इतर दुकाने बंद होती. त्यामुळे जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. (Cloudburst In Uttarakhand Devprayag, Shops Houses Damaged)

मंगळवारी सायंकाळी देवप्रयागच्या दशरथ पर्वतावर ढगफुटीची घटना घडल्याने शांता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी, माती, दगड वाहात आले. यामुळे शांती बाजारचे मोठे नुकसान झाले. आयटीआयटीची तीन मजली इमारत ढासळली. इमारतीत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने कसेतरी आपला जीव वाचवला. दुसरीकडे, शांता नदीवर असणारा पूल, रस्ता उद्धवस्त झाला. तसेच ज्वेलर्स, कपडे, मिठाईची दुकाने नदीच्या पाण्यात पाहून गेली. शांती बाजारचे मोठे नुकसान झाले असल्यादा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोना कर्फ्युमुळे लोक घराबाहेर नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. घटनास्थळी पोलिस टीम तैनात करण्यात आली आहे.

Web Title: Cloudburst In Uttarakhand Devprayag Shops Houses

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devprayag
go to top