
श्रीनगर: नुकत्याच झालेल्या ढगफुटीतून जम्मू आणि काश्मीर अद्याप सावरलेले नसताना राज्याला दुसऱ्यांदा ढगफुटीचा सामना करावा लागला आहे. चशोट गावात ढगफुटीमुळे ६० जणांचा मृत्यू झाला असताना कथुआ जिल्ह्यातही रविवारी सकाळी दोन ठिकाणी ढगफुटी व दरड कोसळण्याच्या घटनांत किमान सात जणांचा मृत्यू झाला असून इतर पाचजण जखमी झाले. पुढील सूचनेपर्यंत उधमपूर आणि पठाणकोटदरम्यानची रेल्वेसेवाही बंद करण्यात आली आहे.