
सिमला : हिमाचल प्रदेशात ढगफुटीने हाहाकार माजला आहे. कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. हवामान खात्याने रविवारी २९ जून साठी ऑरेंज ॲलर्ट जारी केला असून काही ठिकाणी महापूर येण्याचा आणि भूस्खलनाच्या घटना होण्याचा इशारा दिला आहे.