मलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमाचे केजरीवालांना निमंत्रणच नाही

CM Arvind Kejriwal and Deputy CM Manish Sisodia dropped from the school event of Melania Trump
CM Arvind Kejriwal and Deputy CM Manish Sisodia dropped from the school event of Melania Trump

अहमदाबाद : अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प या त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान राजधानी दिल्लीतील शाळांना भेट देत तेथील 'हॅप्पीनेस क्लास'ची माहिती घेणार आहेत. दक्षिण दिल्लीतील शाळेला मेलानिया भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीदरम्यान त्या साधारणपणे तासभर शाळकरी मुलांबरोबर असतील. यावेळी दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मेलानिया यांचे खास स्वागत करतील, अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती, मात्र केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना आमंत्रणच नसल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे आता केजरीवाल मेलानिया यांच्या स्वागतासाठी  जाणार की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे हॅप्पीनेस क्लासचे जनक मानले जातात. मुलांवरील शालेय अभ्यासाचा ताण कमी व्हावा, या उद्देशानेच या क्लासची सुरुवात करण्यात आली असून त्यामध्ये योगासने आणि मैदानी खेळांचा समावेश आहे. ट्रम्प यांचा गुजरात दौरा 

रोडशोसाठी केवळ एक लाख माणसे 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान गुजरातमध्ये होणाऱ्या रोड शोवरून समाज माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. खुद्द ट्रम्प यांनीच या रोडशोमध्ये सत्तर लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा केल्यानंतर तो आता अहमदाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. या रोडशोमध्ये केवळ एक लाख लोक सहभागी होतील, असे महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com