ट्रम्प यांच्या स्वागतासठी अहमदाबाद सज्ज; कैलाश खेर यांच्या 'जय जयकारा'ने सुरवात

वृत्तसंस्था
Saturday, 22 February 2020

अहमदाबादच्या रस्त्यारस्त्यावर ट्रम्प व मिलेनिया ट्रम्प यांचे पोस्टर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कैलाश खैर यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 'नमस्ते ट्रम्प' असे या कार्यक्रमाचे नाव आहे. 

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ जानेवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरू झाली असून मोटेरा मैदानाच्या उद्धाटनासाठी ट्रम्प यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उद्धाटनाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तर अहमदाबादच्या रस्त्यारस्त्यावर ट्रम्प व मिलेनिया ट्रम्प यांचे पोस्टर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कैलाश खैर यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 'नमस्ते ट्रम्प' असे या कार्यक्रमाचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम बांधण्यात आले असून त्याचे उद्धाटन ट्रम्प यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. एएनआयशी बोलताना खेर यांनी सांगितले की 'कार्यक्रमाची सुरवात जय जय कारा स्वामी देना साथ हमारा' या गाण्याने करणार आहेत आणि शेवट 'बम बम लहिरी' या गाण्याने होईल. मला शक्य झाल्यास ट्रम्प यांना माझ्या गाण्यावर डान्सही करायला लावेन.' असे त्यांनी यावेळी सांगितले.      

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ट्रम्प यांच्या स्वागतासठी तयार राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahemdabad ready to welcomes Donald Trump