
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढचा आठवडाभर दिल्लीच्या सर्व सीमा बंद म्हणजे सील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंतची संचारबंदी दिल्लीत कायम राहणार आहे.
बाहेरचे संक्रमण रोखण्यासाठी उपाय, तसेच बाहेरच्या राज्यांतील रुग्णांना दिल्लीत उपचारांसाठी येऊ द्यायचे काय? यासंदर्भात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोशल मीडियावरून दिल्लीकरांची मते मागवली आहेत.
लॉकडाऊन-4 मध्ये 17 मेनंतर दिल्लीमधील बाजारपेठा, बससेवा, रिक्षा, कॅब इत्यादी व्यवहार सुरू करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला; मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या रोज झपाट्याने वाढू लागली. आज कोरोनाबाधितांच्या संख्येत दिल्ली देशात महाराष्ट्र आणि गुजरातपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असून, रुग्णांची अधिकृत आकडेवारी 19844 वर पोचली असून, मृतांची संख्या 640 झाली आहे.
वाढते संक्रमण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने अखेर दिल्लीच्या सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिल्लीच्या सीमा सील करतानाच केशकर्तनालय व्यवसाय सुरू करण्याचाही निर्णय जाहीर केला; मात्र स्पा, जिमसारखे व्यवसाय तूर्तास बंद राहतील. ऑटो, ई-रिक्षा या वाहनांमध्ये एकच प्रवासी बसवण्याचा नियम सध्या आहे; मात्र तोही शिथिल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केजरीवाल म्हणाले. बाजारपेठा आणि दुकाने उघडण्याबाबत ऑड-ईवन पद्धती समाप्त करण्याचे संकेत त्यांनी दिले.
निर्णयाविरोधात भाजपकडून निदर्शने
दिल्लीच्या सीमा सील करण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयाविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांनी आज लॉकडाउन आंदोलन, प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. खासदार तिवारी काही दिवसांपूर्वी लॉकडाउन नियम तोडून हरियाणामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेले, तोही चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.