काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ने काहीही होणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi-Sonia Gandhi, cm basavaraj bommai

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ने काहीही होणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की, काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा कोणताही परिणाम होणार नाही. 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकातून जात आहे. गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी देखील यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा: 27 कोटींचं एक घड्याळ! दिल्ली विमानतळावर कस्टमची जप्तीची मोठी कारवाई

काँग्रेसच्या दौऱ्याला आव्हान देण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या नेत्यांच्या सभा आणि राज्यव्यापी दौरे आखत असल्याचा दावा बोम्मई यांनी फेटाळून लावला. आमचे दौरे आणि सभांची योजना फार पूर्वीच बनवण्यात आली होती, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यात्रेत सोनिया, प्रियंका गांधी-वड्रा आणि राहुल गांधी यांच्या सहभागामुळे राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होईल का या प्रश्नावर बोम्मई म्हणाले, "सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षासाठी काम करणे स्वाभाविक आहे. त्यांनी (सोनिया गांधी) अर्धा किलोमीटर पदयात्रा केली. त्यानंतर त्या निघून गेल्या. त्यांच्या यात्रेचा आमच्याशी काहीही संबंध नाही आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काही फरक पडणार नाही, असंही ते म्हणाले.

काँग्रेसच्या दौऱ्याला उत्तर म्हणून भाजप नेत्यांच्या रॅली आणि राज्यव्यापी दौऱ्याच्या नियोजनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते म्हणाले की, हे खूप पूर्वीपासून नियोजित होते. मात्र विधानसभेचे अधिवेशन असल्याने दसऱ्यानंतर आयोजन करण्याचा निर्णय घेतला.