काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी; CM बोम्मईंकडून थेट चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Basavaraj Bommai Siddaramaiah

राज्य सरकारनं सिद्धरामय्यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचा मुद्दा गांभीर्यानं घेतलाय.

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याची धमकी; CM बोम्मईंकडून थेट चौकशीचे आदेश

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Congress leader Siddaramaiah) यांना जीवे मारण्याच्या धमक्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

बोम्मई म्हणाले, राज्य सरकारनं सिद्धरामय्यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचा मुद्दा गांभीर्यानं घेतलाय. या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलेत. बोम्मईंनी पत्रकारांना सांगितलं की, 'आम्ही हा मुद्दा गांभीर्यानं घेतला असून मी पोलिस (Karnataka Police) महासंचालकांनाही फोन करून त्यांच्याशी याबाबत बोललोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करतील. पुरेशी सुरक्षा पुरवण्याचे निर्देश मी विरोधी पक्षनेत्यांना दिले आहेत.'

हेही वाचा: गणेशोत्सवात डॉल्बी वाजलीच पाहिजे; उदयनराजेंचं पोलिसांना थेट चॅलेंज

वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण होत असताना, काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दावा केलाय की, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. तत्पूर्वी शुक्रवारी, कर्नाटक काँग्रेसनं (Karnataka Congress) आपल्या भेटीदरम्यान सिद्धरामय्या यांच्यावर झालेल्या अंडी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कोडगू जिल्ह्यात निदर्शनं केली. सिद्धरामय्या यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या वाहनावर अंडी फेकणाऱ्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचा: दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणाऱ्या हवाला एजंटला अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई