CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस पानिपतला भेट देणार
Maratha Valor : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४ जानेवारी रोजी पानिपत येथील शौर्य स्मारकाला पहिल्यांदाच भेट देणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत, आणि यंदा पानिपत युद्धाच्या २६४ व्या वर्धापनदिनानिमित्त शौर्याला वंदन करण्यात येईल.
नवी दिल्ली : मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच पानिपत येथील शौर्य स्मारकाला १४ जानेवारी रोजी भेट देणार.