

Economy
sakal
उत्तराखंड सरकारने राज्याच्या विशाल हर्बल (वनौषधी) संपदेचा फायदा घेण्यासाठी आणि याला एका मजबूत 'हर्बल इकॉनॉमी' मध्ये रूपांतरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सचिवालयात जडीबुटी सल्लागार समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आणि अधिकाऱ्यांना या क्षेत्रात इनोवेशन , व्हॅल्यू ॲडिशन आणि मार्केटिंग यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.