

Devendra Fadnavis Chair Breaks on Stage Chaos During Bihar NDA Campaign Video Viral
Esakal
बिहारमध्ये निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. भाजपने प्रचारासाठी दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री, काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही प्रचारात उतरवलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी खगडिया जिल्ह्यात गेले आहेत. दरम्यान, व्यासपीठावर बसताना अचानक खुर्ची मोडल्यानं त्यांचा गोंधळ उडाला. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान होते. खुर्ची मोडल्यानंतर दुसरी खुर्ची मागवण्यात आली.