CM Mamata Banerjee Reacts to RG Kar Hospital Case : आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच आरोपीला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निर्णयावर पीडितेच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्ती केली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याबाबत असमाधानी असल्याचं म्हटलं आहे.