आता काश्मीरी मुलगी सून करून आणू शकतो : खट्टर

वृत्तसंस्था
Saturday, 10 August 2019

'मंत्री ओ. पी. धनखड नेहमी म्हणतात की मी बिहारमधून सून आणणार, पण आता लोकं म्हणत आहेत की, आता काश्मीरचा मार्ग मोकळा झाला आहे. आता काश्मीरची सून करू शकतो,' असे वक्तव्य त्यांनी 'बेटी बढाओ बेटी पढाओ'च्या कार्यक्रमात केले. त्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे.

फतेहबाद : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काश्मिरी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मिरी मुलींना लग्नासाठी आणिता येईल,' असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. तसेच सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका होत आहे.

'मंत्री ओ. पी. धनखड नेहमी म्हणतात की मी बिहारमधून सून आणणार, पण आता लोकं म्हणत आहेत की, आता काश्मीरचा मार्ग मोकळा झाला आहे. आता काश्मीरची सून करू शकतो,' असे वक्तव्य त्यांनी 'बेटी बढाओ बेटी पढाओ'च्या कार्यक्रमात केले. त्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे.

यापूर्वी भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनीही काश्मिरी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Manoharlal Khattar controversial statement regarding kashmiri girls