
पाटणा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेेबांधणी सुरू केली असून मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी बिहारमध्ये उद्योगपुरक वातावरण तयार करण्यासाठी उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी अनेक आर्थिक विशेष पॅकेजची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयाची माहिती दिली.