आम्ही कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करत नाही, 'या' सर्व फालतू गोष्टी : CM नितीश कुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar

भाजप सातत्यानं मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी करत आहे.

'आम्ही कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करत नाही, या सर्व फालतू गोष्टी'

पूर्णिया (बिहार) : लाऊडस्पीकर (Loudspeaker) वादावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. हा सगळा वाद निरुपयोगी असल्याचं सांगून ते म्हणाले, मी कधीही धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करत नाही, त्यामुळं या सर्व फालतू चर्चा आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. सीएम नितीश यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलंय, जेव्हा भाजप (BJP) सातत्यानं मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी करत आहे.

राज्यातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी बिहारमध्ये (Bihar) योगी मॉडेल लागू करण्याबाबत बोललं आहे. त्याचवेळी जेडीयू सातत्यानं भाजपच्या मागणीपासून अंतर राखत होती. मात्र, आता खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. भाजपकडून मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी सातत्यानं केली जात आहे. त्यासोबतच याबाबत सरकारवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा: "मुस्लिमांचा अल्लाह बहिरा आहे, त्यामुळं..."; साध्वींचं वादग्रस्त विधान

परेरा येथील इथेनॉल प्लांटचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री शनिवारी पूर्णियाला पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत बिहारचे उद्योगमंत्री शाहनवाज हुसेनही होते. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लाऊडस्पीकर वादावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'या सर्व फालतू चर्चा आहेत. इथेनॉलबद्दल बोला.. ही चर्चा सोडा (लाऊडस्पीकरचा वाद). बिहारमध्ये यावर आमची काय भूमिका आहे, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कोणत्याही धर्मात मध्यस्थी करत नाही. इथं सर्व धर्मांना त्यांचं काम करण्याची परवानगी आहे.' बिहारमधील मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा मुद्दा जोर धरत असताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं हे विधान आलंय.

Web Title: Cm Nitish Kumar Has Expressed His Views On The Loudspeaker Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top