विद्यार्थ्यांसमोर कंडोमचा उल्लेख केल्याने महिला IAS अडचणीत; CMचे चौकशीचे आदेश

ias officer
ias officer

पाटणा - पाटणामध्ये एक महिला आयएएस अधिकारी कंडोमसंदर्भात केलेल्या टीप्पणीमुळे अडचणीत आल्या आहेत. वक्तव्याची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आयएएसविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दोषी आढळल्यास अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असंही म्हटलं आहे. (ias officer news in Marathi)

ias officer
Viral Video: तर कंडोम ही मोफत द्यावे लागतील; महिला IAS अधिकाऱ्याचे वादग्रस्त विधान

याआधी राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे, हरजोत कौर भामरा, असं अधिकारी महिलेचं नाव आहे. महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने 'सशक्त बेटी, समृद्धी बिहार: टूवर्ड्स एन्हांसिंग द व्हॅल्यू ऑफ गर्ल चाइल्ड' या विषयावर मंगळवारी पाटणा येथे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एका विद्यार्थीनीने प्रश्न विचारला होता की, हे सर्व ड्रेस सरकार देते, मग सॅनिटरी पॅड मोफत का मिळत नाही? त्यावर महिला अधिकाऱ्याने सर्व मर्यादा पार करून त्या मुलीला उत्तर दिले की आज सॅनिटरी पॅड मागताय, उद्या मुलांना कंडोमपण मोफत द्यावे लागतील. त्यावर एका मुलीने प्रश्न केला की जनतेच्या मताने सरकार बनते, त्याला महिला अधिकाऱ्याने मूर्खपणाचा कळस म्हटलं होत.

या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून महिला अधिकाऱ्यावर टीका होत आहे. याची गंभीर दखल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com