
सकाळ वृत्तसेवा
पहलगाम : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे स्मारक बैसरन खोऱ्यात बांधण्यात येईल, अशी घोषणा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. दहशतवाद हा राज्याच्या विकासात अडथळा आणू शकत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.