
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या संतांसारखे व्यक्तिमत्त्व आहे तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अत्यंत धाडसी व्यक्तिमत्त्व आहेत, त्यामुळे मला माझे व्यक्तिमत्त्व त्यांच्यासारखे घडवायचे आहे, असे मत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ‘पीटीआय’ला बुधवारी संध्याकाळी दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.