कर्नाटकातील पुराला महाराष्ट्रच कारणीभूत : येडीयुराप्पा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 August 2019

45 वर्षात कधी न झालेला पाऊस यंदा झाला आहे. एनडीआरएफचे दोन पथक आणि दोन हेलिकॉप्टर  मदतीसाठी आहेत. याशिवाय केंद्र सरकार यांच्याशी  चर्चा करून आणखी एनडीआरएफचे पथक मदतीसाठी घेण्याचे नियोजन असल्याचे येडीयुराप्पा यांनी सांगितले.

बेळगाव : जिल्हातील 106 गावे पुराच्या विळख्यात अडकली असून 20 हजार 600 जणांना सुरक्षितस्थळी  स्थलांतरीत करण्यात आली आहेत. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यांच्या कुटूंबियांना शासकीय मदत दिली जाईल. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील पुरस्थितीला महाराष्ट्र पाणलोट क्षेत्रातून वाढलेला विसर्ग कारणीभूत असल्याचा आरोप मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी पूरस्थिती पाहणीसाठी बुधवारी (ता. 8) बेळगावात दाखल झाले आणि आज शहरात पाहणी केली. या दरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते. शहरातील कपिलेश्वर कॉलनी, शहापूर, वडगाव आदी भागातील निवारा केंद्राला भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केली.

येडीयुराप्पा म्हणाले, ''अतिवृष्टी सुरू असून त्यात महाराष्ट्र राज्यातील पाणलोट क्षेत्रातून विसर्ग सुरू आहे. यामुळे रायबाग, चिकोडी आणि अथणी या तीन तालुक्यातील 106 गावांना फटका बसला असून गावातील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येत असून तआतापर्यंत 20 हजार 600 जणांचे स्थलांतर केले आहे. सहा जणांचा पुरात बळी गेला असून सर्वांना शासकीय मदत देण्यात येईल.''

45 वर्षात कधी न झालेला पाऊस यंदा झाला आहे. एनडीआरएफचे दोन पथक आणि दोन हेलिकॉप्टर  मदतीसाठी आहेत. याशिवाय केंद्र सरकार यांच्याशी  चर्चा करून आणखी एनडीआरएफचे पथक मदतीसाठी घेण्याचे नियोजन असल्याचे येडीयुराप्पा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Yediyurappa criticizes Maharashtra for flood condition in Karnataka