CM योगी आदित्यनाथ यांना लॅपटॉपही वापरता येत नाही - अखिलेश यादव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

CM योगी आदित्यनाथ यांना लॅपटॉपही वापरता येत नाही - अखिलेश यादव

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वारे वाहायला सुरूवात झाली आहे. वेगवेळ्या पक्षांच्या सभा आणि कार्यक्रमांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील आज उत्तर प्रदेशमध्ये आहेत. अमित शहा यांनी समाजवादी पक्षावर केलेल्या टीकेनंतर अखिले यादव यांनी देखील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi Adityanath) यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशला योगी सरकारची नाही तर योग्य सरकारची गरज आहे.

हेही वाचा: CM योगींमुळे जातीवाद, घराणेशाही संपली - अमित शहा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशला योगी सरकारची नाही तर, ज्याला लॅपटॉप, इंटरनेट चालवता येतं अशा योग्य सरकारची गरज आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांना लॅपटॉपही चालवता येत नाही. मी असेही ऐकले आहे की, त्यांना फोन कसा चालवायचा हे देखील माहित नाही. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप विकासाचे नव्हे तर विनाशाचे राजकारण करते. त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे.

loading image
go to top