CM Yogi Adityanath
sakal
उत्तर प्रदेशात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांवर निर्णायक कारवाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या कारवाईची सूत्रे हाती घेतली आहेत.
सोमवारी त्यांनी लिहिलेल्या ‘योगी की पाती’ मध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, उत्तर प्रदेशात एकाही घुसखोराला खपवून घेतले जाणार नाही. सीएम योगी म्हणाले की, "राज्यातील संसाधनांवर नागरिकांचा अधिकार आहे, घुसखोरांचा नाही." सार्वजनिक संसाधनांवर आलेला अनधिकृत ताण दूर करणे आवश्यक आहे.