

Uttar Pradesh CM Yogi Adityanath Reviews ‘Mini Kumbh’ Preparations in Prayagraj
Sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी पवित्र प्रयागराज नगरीला भेट देऊन माघ मेळाव्याच्या तयारीचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. महाकुंभ २०२५ च्या भव्य यशानंतर आता माघ मेळावा २०२६ हा 'मिनी कुंभ'च्या धर्तीवर आयोजित करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी त्रिवेणी संगमावर स्नान करून गंगा पूजन केले आणि भाविकांच्या सोयीसाठी 'माघ मेळा सेवा' नावाचे डिजिटल ॲपही लाँच केले.