नाव बदलण्याची मालिका सुरूच; आता आझमगडचं नाव होणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi-Adityanath

नाव बदलण्याची मालिका सुरूच; आता आझमगडचं नाव होणार...

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यापासून राज्यातील वेगवेळ्या शहरांची नावं बदलण्यात आली आहे. नाव बदलण्याच्या या योगी सरकाच्या मालिकेमुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली आहे. त्यातच आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आणखी एका शहराचं नाव बदलणार असल्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका सभेला संबोधित करत असताना योगी आदित्यनाथ यांनी आझमगडचे नाव बदलण्यात येणाऱ असल्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: CM योगी आदित्यनाथ यांना लॅपटॉपही वापरता येत नाही - अखिलेश यादव

गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आझमगड येथे एका सभेला संबोधित केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमगड मतदारसंघाचे नाव बदलण्याचा इशारा दिला आहे. लवकरच आझमड शहराचं नाव आर्यमगड होईल असं विधान त्यांनी यावेळी केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आझमगडमध्ये सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना योगीजींनी जातीवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचं राजकारण संपवल्याचं संपवल्याचं विधान केलं. उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले की, 2015 पूर्वी उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था देशात 6 व्या क्रमांकावर होती आणि आज ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. बेरोजगारीचा दर 4.1% पर्यंत कमी झाला. तसेच 40 वैद्यकीय महाविद्यालये आहेत, वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा 3800 वर गेल्या आहेत.

loading image
go to top