
CM Yogi Adityanath
sakal
गोरखपूर: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी गोरखपूर येथील महायोगी गोरखनाथ विद्यापीठात 'विकसित भारत – विकसित उत्तर प्रदेश व्हिजन-२०४७' या कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचे जे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यानुसार उत्तर प्रदेश सरकार काम करत आहे.