''चंद्रगुप्त मौर्य यांनी केला सिकंदरचा पराभव'', मुख्यमंत्री योगींचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi-Adityanath

''चंद्रगुप्त मौर्य यांनी केला सिकंदरचा पराभव'', मुख्यमंत्री योगींचा दावा

लखनौ : ''मौर्य राज्याची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्य यांनी मॅसेडोनियाच्या सिकंदरचा पराभव केला होता. तरीही इतिहासकारांनी त्याचे वर्णन 'महान' केले नाही'', असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी केला आहे. भाजप ओबीसी मोर्चातर्फे सामाजिक प्रतिनिधी सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी योगींनी हे वक्तव्य केले.

हेही वाचा: संतापजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर ४०० जणांचा बलात्कार

''इतिहासात सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य यांना कधीच महान म्हटले नाही. पण, ज्या सिकंदरचा चंद्रगुप्त मौर्य यांनी पराभव केला होता त्याचा उल्लेख मात्र महान असा करण्यात आला. या मुद्द्यावर इतिहासकार अद्यापही गप्प बसले आहेत. देशातील जनतेला हा खरा इतिहास माहिती झाल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने बदलायला लागेल'', असं योगी म्हणाले.

सिकंदरचा मृत्यू त्याच्या भारतीय मोहिमेनंतर इसवीसपूर्व ३२३ मध्ये झाला. त्यातच चंद्रगुप्त मौर्य सत्तेत कधी आले याबाबत इतिहासकारांमध्ये अजूनही मतमतांतरे आहेत. पण, चंद्रगुप्त सिकंदरच्या मृत्यूनंतर सत्तेत आल्याचे मानले जाते. त्यामुळे 'चंद्रगुप्त मौर्यने सिकंदरचा पराभव केला होता' या योगींच्या नव्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधत फाळणीला घडवून आणणारे लोक तालिबानला पाठिंबा देत असल्याचे म्हटले. ''मोहम्मद अली जिना देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर भारत एकसंध राहिला असता'' असे म्हटल्याच्या एका दिवसानंतर सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी गुरुवारी फाळणीसाठी आरएसएसला जबाबदार धरले होते. गेल्या महिन्यात सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी पाकिस्तानचे संस्थापक महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्याशी बरोबरी केली होती. त्याबाबत बोलताना योगी म्हणाले, ''जे फाळणीबद्दल बोलत आहेत ते एक प्रकारे तालिबानला पाठिंबा देत आहेत. तालिबानी पुन्हा अफगाणिस्तानात घुसले तेव्हा त्याच्या समर्थनार्थ अनेक आवाज उठविण्यात आले. कडक कारवाई झाल्यावरच हे आवाज शांत झाले. तालिबानला पाठिंबा देणे म्हणजे मानवताविरोधी शक्तींना पाठिंबा देणे आणि महिलाांसह मुलांचा अपमान करणे. तालिबानला पाठिंबा देणे म्हणजे भगवान बुद्धांच्या ‘मैत्री [मैत्री]’ या संदेशाविरुद्ध काम करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणे. काही लोक त्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे'', असे मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले.

loading image
go to top