संतापजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर ४०० जणांचा बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

संतापजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर ४०० जणांचा बलात्कार

बीड : अल्पवयीन मुलीवर तब्बल ४०० जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (Beed minor girl physical abused) तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेली असता पोलिसाने (beed police) देखील तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप पीडितेने केला आहे. सध्या ती दोन महिन्यांची गर्भवती असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसह चौघांचा २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी आठ महिन्यांपूर्वी तिचे लग्न लावून दिले. मात्र, पतीसह सासरच्या मंडळींनी तिचा छळ केलाय. त्यामुळे तिने पळ काढला आणि वडिलांचे घर गाठले. पण, वडिलांनी तिला घरी ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे तिने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बसस्थानकावर भीक मागायला सुरुवात केली. याच काळात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिने केला आहे.

मुलीने स्वतः पुढे येऊन माहिती दिल्यानंतर बालकल्याण समितीने तिची दखल घेतली. ''माझ्यावर अनेकांनी अत्याचार केले असून अंबाजोगाई पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोषींवर कारवाई केली नाही. त्याऐवजी एका पोलिसाने मला जाणीवपूर्वक त्रास दिला,'' असं बालकल्याण समितीला दिलेल्या निवेदनामध्ये तिने म्हटलंय.

अखेर या आठवड्यात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून बालविवाह प्रतिबंध कायदा, लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या बलात्कार आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामासामी यांनी एनआयला दिली.

loading image
go to top