

CM Yogi Adityanath
sakal
सोमवारी सकाळचा 'जनता दर्शन' (Janta Darshan) कार्यक्रम एका आईसाठी आशेचा किरण घेऊन आला. लखनौ येथील एका महिलेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि त्यांच्या सात महिन्यांच्या बाळाला हृदयविकाराचा त्रास असल्याचे सांगितले. परंतु, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचार करणे शक्य होत नसल्याचे तिने सांगितले.