

CM Yogi speaks on Mathura-Kashi temple disputes, religious development, nationwide outreach
sakal
उत्तर प्रदेश : अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारल्यानंतर आता देशात काशी आणि मथुरा येथील धार्मिक वादांवर चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी यासंबंधीच्या एका प्रश्नावर थेट भाष्य केले. हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट २०२५ मध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काशी-मथुरा वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आम्ही सर्व ठिकाणी पोहोचणार आणि पोहोचलो आहोत. सीएम योगी म्हणाले, "वारशाबद्दल कोणत्याही समाजाला गौरवाची भावना असायला हवी, आणि त्याच दिशेने ही सर्व कार्ये सुरू झाली आहेत."