Nirbhaya Case : अधिकारी म्हणतात, 'तिला दिल्लीला का पाठवले?'

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

सीएमओला निलंबित करा; निर्भयाच्या आईची मागणी

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. यातील दोषींना अद्याप फाशी झालेली नाही. त्यांच्या फाशीचे प्रकरण समोर असतानाच आता एका सीएमओने याबाबत वक्तव्य केले. निर्भया बलात्कार प्रकरणाबाबत बोलताना सीएमओ पी. के. मिश्रा म्हणाले, तिला दिल्लीला पाठविले का? तिला इथेच राहू द्यायचे ना.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निर्भया प्रकरणातील पीडित तरुणी उत्तर प्रदेशच्या एका गावातील रहिवासी होती. 16 डिसेंबर, 2012 मध्ये निर्भया प्रकरण घडले होते. तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता दिली होती. तिथे अद्यापही परिस्थिती सुधारली नाही. त्याविरोधातच गावकऱ्यांनी धरणे आंदोलन केले होते. त्यासाठी सीएमओही उपस्थित होते. 

मिश्रा म्हणाले...

गावकऱ्यांशी बोलताना सीएमओ म्हणाले, इथे 17 वर्षे वैद्यकीय शिक्षण घेण्याची कोणाची हिंमत आहे. जर डॉक्टर बनण्याची क्षमता नसेल तर इथं डॉक्टर येणार तरी कुठून? त्यावर गावकरी म्हणाले, डॉक्टर बनण्यासाठीच दिल्लीला पाठविले होते. निर्भयाचे नाव ऐकले नाही का? त्यावर अधिकारी म्हणाले, तिला दिल्लीला का पाठवले? तिला इथेच ठेवायचे ना. 

Nirbhaya Case : निर्भयाच्या आईला न्यायालयात अश्रू अनावर; म्हणाल्या...

सीएमओला निलंबित करा; निर्भयाच्या आईची मागणी

या वक्तव्याची माहिती मिळाल्यानंतर निर्भयाची आई आशादेवी यांनी यावर दु:ख व्यक्त केले असून, 7 वर्षांनंतरही सीएमओसारखी व्यक्ती माझ्या मुलीला दोषी ठरवत असेल तर मी निषेध करते. संबंधित सीएमओला निलंबित केले पाहिजे. त्यांनी जे काही वक्तव्य केले त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CMO PK Mishra talked about Nirbhaya Case Victim