esakal | सणासुदीत महागाईचा फटका! 13 दिवसांत दुसऱ्यांदा वाढल्या CNG-PNGच्या किमती
sakal

बोलून बातमी शोधा

cng-png

महागाईचा फटका! 13 दिवसांत दुसऱ्यांदा वाढल्या CNG-PNG किमती

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : महागाईचा भडका पुन्हा एकदा वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel rates) वाढत्या किमतीसोबतच दरम्यान सीएनजीच्या (CNG-PNG rates) किंमतीत वाढ होत आहे. यासह, स्वयंपाकी गॅससाठी पाईपलाईन म्हणजेच नैसर्गिक वायूचा (पीएनजी) वापरही वाढला आहे. भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते.

सप्टेंबर महिन्यापासूनच पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ

सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणतीही वाढ केलेली नाही. आज इंधन दर स्थिर आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. रविवारी पेट्रोलचा भाव 30 पैसे प्रति लीटरने वाढला होता. तर डिझेल दर 35 पैसे प्रति लीटरने महागलं होतं. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज वाढत्या होत्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत पेट्रोल 2.80 रुपयांनी महागलं, तर डिझेल किंमतीत 3.30 रुपयांची वाढ झाली.

हेही वाचा: "परमबीर सिंग हेच वाझेचे 1 नंबर बॉस!'' 12 साक्षीदारांची साक्ष

CNG-PNG-LPG महागला

एलपीजीही (LPG) आता महाग झाला असून पीएनजीच्या स्वरूपात वापरलेला एलपीजी देखील महाग झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत 33.01 SCM ऐवजी 35.11 रुपयांवर गेली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये ते 32.86 रुपयांऐवजी 34.86 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे, आता गुरुग्राममध्ये त्याची किंमत 33.31 क्यूबिक मीटर आणि रेवाडी आणि कर्नालमध्ये 33.92 प्रति क्यूबिक मीटर झाली आहे. मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली येथेही किमती वाढल्या आहेत. आता पीएनजीला (PNG) येथे 38.37 रुपये मिळतील. बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून दिल्लीत सीएनजी (CNG) 49.76 रुपये प्रति किलो उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, पीएनजीलाही दिल्लीमध्ये प्रति एससीएम 35.11 रुपये मिळतील. दिल्लीमध्ये सीएनजी 2.28 रुपये प्रति किलो महाग झाले आहे, तर पीएनजी 2.10 रुपये प्रति एससीएम महाग झाले आहे.

तेलाच्या किंमती वाढल्याने दरात वाढ

देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.

हेही वाचा: काश्मीरमध्ये हिंसा घडताना अमित शहा गरबा खेळत होते; काँग्रेसची टीका

तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना

भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण सध्यस्थिती वाढलेल्या तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. दरम्यान, सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.

एलपीजी किंमत कशी तपासाल?

एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलेंडरची किंमत तपासू शकता. (after lpg cng and png gas price hike in mumbai by 1 5 rupees per kilo)

loading image
go to top