esakal | कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

nirmala-sitharaman

कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारतात कोळसा संकट निर्माण झाल्याचं वृत्त निराधार असून या केवळ अफवा आहेत. उलट भारत हा पॉवर सरप्लस देश असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केला आहे. हॉर्वर्ड कॅनेडी शाळेत एका वार्तालापादरम्यान ते बोलत होत्या. प्राध्यापक लॉरेन्स समर्स यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

सीतारामण म्हणाल्या, ही निव्वळ अफवा आहे. भारतात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. खरंतर मला मंत्री आर के सिंह यांचं वक्तव्य आठवतंय की, ऊर्जा निर्मिती प्रकल्पांजवळ पुढील चार दिवसांचा स्टॉक त्याच्या परिसरात उपलब्ध आहे. यामुळे पुरवठा साखळीवर कोणताही परिणाम झालेला नाही. अशा प्रकारची कुठलीही कमतरता नाही ज्यामुळे वीजेच्या पुरवठा कमी होईल. भारतात वीजेची स्थिती ठीक आहे. आता आपण एक पॉवर सरप्लस देश आहोत.

कोविड लसीकरण हा दशकांच्या मेहनतीचा परिणाम

सीतारामण म्हणाल्या, भारतानं अनेक दशकांपासून हळूहळू आपली संस्थात्मक व्यवस्था तयार केल्या आहेत. हे ग्रामीण स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जी त्या भागात मूलभूत प्राथमिक सेवा उपलब्ध करते. अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या, या आरोग्य केंद्रांवर मुलांना आवश्यक डोस दिले जातात. त्याचबरोबर पोलिओचा प्रसार रोखण्यासाठीही या आरोग्य केंद्रांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

भारत सरकारनं १०० कोटी डोसची व्यवस्था कशी केली हे सांगताना सीतारामण म्हणाल्या, आमच्याकडे जसे डोस उपलब्ध होत होते तसे आम्ही ते लोकांसाठी उपलब्ध करुन देत होतो. आम्ही दुर्गम भागातही गेलो तिथल्या लोकांनाही डोस दिले. सुरुवातीला डोसची ने-आण करताना त्याचं तापमान स्थिर राखणं हे आमच्यासाठी मोठं आव्हान होतं. पण सुदैवानं आम्ही ज्या दोन लसींचा वापर करतो आहोत त्यासाठी ही समस्या उद्भवली नाही.

loading image
go to top