2 साप प्रवृत्तीच्या नेत्यांसोबत सरकार स्थापन करणे मोदींची सर्वात मोठी चूक'; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेऊन २४ तास झाले नाहीत तोच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
2 साप प्रवृत्तीच्या नेत्यांसोबत सरकार स्थापन करणे मोदींची सर्वात मोठी चूक'; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेऊन २४ तास झाले नाहीत तोच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. घटक पक्षांसोबत मिळून सरकार स्थापन केल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदींची ही सर्वात मोठी चूक आहे, असं ते म्हणाले आहेत.

भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळवता आलेलं नाही. भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत, तर एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. जतना दल संयुक्त आणि तेलुगु देसम पार्टी हे एनडीएमध्ये महत्त्वाचे घटक पक्ष ठरले आहेत. जेडीयूला १२ तर टीडीपीला १६ लोकसभेच्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी मोदींना टीडीपी आणि जेडीयूची मदत घ्यावी लागली आहे. हाच मुद्दा पकडत स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला.

2 साप प्रवृत्तीच्या नेत्यांसोबत सरकार स्थापन करणे मोदींची सर्वात मोठी चूक'; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
Share Market Opening: मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक... सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारांचा टप्पा पार, निफ्टी 23400 च्या वर

विनाश काले, विपरीत बुद्धी. भारतीय राजकारणातील दोन साप प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांसोबत युती करून मोदींनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. हे दोघे हिंदुत्वाच्या उंठावर बसून धर्मनिरपेक्षतेला पुढे करतील. येत्या काही महिन्यामध्ये भाजपमध्ये अव्यवस्था निर्माण होणार आहे. नवा भगवा भाजप उदयास येईल, असं स्वामी म्हणाले आहेत.

पत्रकार अरविंद गुनासेकर यांनी मोदींच्या कॅबिनेटबाबत भाष्य केलं होतं. मोदींसोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संख्या कशी वाढत गेली आहे. याचे त्यांनी विश्लेषण केले होते. २०१४ मध्ये मोदींसोबत शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांची संख्या २३ होती, १० राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), १२ राज्यमंत्री मोदींच्या पहिल्या कार्यकाळात होते. त्यानंतर २०१९ च्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्र्यांची संख्या २४ झाली, तसेच ९ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि २४ राज्यमंत्री यांचा समावेश झाला.

2 साप प्रवृत्तीच्या नेत्यांसोबत सरकार स्थापन करणे मोदींची सर्वात मोठी चूक'; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
PM Modi Government: मोदी सरकारमध्ये शपथ घेतलेल्या मंत्र्याचा 15 तासांतच राजीनामा? कारणही आलं समोर

२०२४ च्या कार्यकाळात मोदींच्या सोबत ३० कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री यांचा समावेश आहे. मोदींच्या सरकारमधील वाढलेल्या मंत्र्यांच्या मुद्द्यावरून स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com