
गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.