
हैदराबाद विमानतळावर परदेशी प्रवाशांकडे सापडलं आठ किलो कोकेन
सोमवारी हैदराबाद विमानतळावर डीआरआयला मोठे यश मिळाले. येथे डीआरआयने कस्टमच्या मदतीने कोकेनची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना पकडले आहे. या दोन्ही प्रवाशांकडून जप्त केलेल्या कोकेनची ग्रे मार्केट किंमत 80 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाईबाबत डीआरआयने एक प्रसिद्धीही जारी केली आहे. यामध्ये डीआरआयने सांगितले की, त्यांना 1 मे रोजी हैदराबाद विमानतळावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी कोकेनची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे, कस्टम्स आणि डीआरआयने संयुक्त कारवाई केली आणि तस्करांकडून 80 कोटी रुपयांचे एकूण आठ किलोग्रॅम कोकेन जप्त केले. रविवारी उशिरा अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या दोन प्रवाशांमध्ये टांझानियन नागरिक आणि एक अंगोलन महिलेचा समावेश आहे.
हेही वाचा: 'साधी विकास सोसायटी काढली नाही…'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
डीआरआयने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की दोन्ही प्रवासी त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेले प्रत्येकी चार किलो कोकेन घेऊन गेले होते. अलीकडच्या काळात हैदराबादमध्ये डीआरआयने पकडलेली ही सर्वात मोठी कोकेन आहे.
हेही वाचा: इलॉन मस्कचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोअर्स फेक; ऑनलाइन टूलचा दावा
Web Title: Cocaine Worth 80 Crore Rupees Seized From Two Passengers In Hyderabad International Airport
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..