इलॉन मस्कचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोअर्स फेक; ऑनलाइन टूलचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elon musk s more than half of twitter followers are fake claims online tool

एलॉन मस्कचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोअर्स फेक; ऑनलाइन टूलचा दावा

इलॉन मस्क यांनी एकीकडे ट्विटरवरील बनावट खात्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते, मात्र आता त्यांचेच अर्ध्याहून अधिक फॉलोअर्स हे बनावट असल्याचे समोर आले आहे. अब्जाधीश एलोन मस्कचे अर्ध्याहून अधिक फॉलोअर्स बनावट आहेत, असा दावा एका ऑनलाइन ऑडिटिंग टूलने केला आहे. मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार केल्यानंतर काही दिवसातच ही बातमी समोर आली आहे.

मस्क यांचे ट्विटरवर 90 मिलीयन फॉलोअर्स आहेत. यातच SparkToro वरील ऑडिटच्या निकालांवरून असे दिसून आले की मस्क यांचे तब्बल 53.3 टक्के फॉलोअर्स बनावट आहेत, याचा अर्थ ते एकतर ही स्पॅम खाती आहेत, बॉट्स आहेत किंवा काही काळापासून सक्रिय नाहीत.

कोणत्याही ट्विटर वापरकर्त्याला त्यांचे किती फॉलोअर्स बनावट आहेत हे तपासण्यासाठी या टूलचा वापर केला जाऊ शकतो . मात्र SparkToro या टूलने दाखवलेली संख्या कन्फर्म करण्याचा कोणताही मार्ग नाहीये.

हेही वाचा: नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती गंभीर; वकिलांची कोर्टात माहिती

या टूल कसे काम करते त्याबद्दल बोलताना स्पार्कटोरोने द इंडिपेंडंटला सांगितले की , या ऑडिट दरम्यान मस्क यांना करणार्‍या सर्वात अलीकडच्या काळात फॉलो केलेल्या 100,000 खात्यांमधून 2,000 रँडम खात्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर 25+ घटक जे स्पॅम/ बॉट/ कमी दर्जाच्या खात्यांशी संबंध शोधला जातो. @elonmusk या अकाउंटसारखे फॉलोअर्स असलेल्या खात्यांमध्ये 41% बनावट फॉलोअर्स असतात, पण या मस्क यांच्या अकाऊंटचे तुलनेत जास्त फेक फॉलोअर्स आहेत, असे स्पार्कटोरोने सांगितले.

मस्क सध्या त्यांचे ट्विटर टेकओव्हर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहेत. दरम्यान मस्क यांनी ते ट्विटरहून बॉट्स आणि स्पॅम खाती हटवतील असे वचन दिले होते. जर आमची ट्विटर बोली यशस्वी झाली, तर आम्ही स्पॅम बॉट्सचा पराभव करू किंवा प्रयत्न करत मरण पत्कारू, टेस्लाचे मालक मस्क यांनी 21 एप्रिल रोजी ट्विट केले होते.

हेही वाचा: 'साधी विकास सोसायटी काढली नाही…'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान न्यूज एजन्सी रॉयटर्सने गेल्या आठवड्यात दिलेल्या रिपोर्टनुसार मस्क यांनी ट्विटरच्या नियोजित खरेदीला वित्तपुरवठा करण्यासाठी टेस्लामधील $ 8.5 अब्ज किमतीचे शेअर्स विकले आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात सुमारे 9.6 दशलक्ष शेअर्स विकले, गुरूवार आणि शुक्रवारी यूएस सिक्युरिटीज फाइलिंगनुसार, कंपनीमधील त्याच्या 5.6 टक्के हिस्सेदारी आहे.

हेही वाचा: हार्दिक पटेलांच्या ट्विटर बायोतून 'कॉंग्रेस' गायब, चर्चांना उधाण

Web Title: Elon Musk S More Than Half Of Twitter Followers Are Fake Claims Online Tool

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TwitterElon Musk
go to top