
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. विमानात बॉम्बची ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बॉम्बची माहिती मिळताच बॉम्ब पथक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह १५७ लोक होते.