esakal | INS विक्रांत उडवण्याची धमकी; तपास यंत्रणा सतर्क
sakal

बोलून बातमी शोधा

INS Vikrant

INS विक्रांत उडवण्याची धमकी; तपास यंत्रणा सतर्क

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोचिन शिपयार्डला (Cochin Shipyard) आलेल्या एका निनावी मेलमध्ये भारताची सर्वात मोठी लढाऊ नौका आयएनएस विक्रांतला उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. कोचिन शिपयार्डला सोमवारी मिळालेल्या या धमकीमुळे केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) हे भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे विमानवाहू जहाज असून, केरळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कोचिन शिपयार्डला मिळालेल्या या धमकीनंतर केरळ पोलिसांनी इंडियन पीनल कोडच्या कलम ३५८ अंतर्गत अज्ञात गुन्हा नोंदवला आहे. शिपयार्डने या प्रकरणात पोलिसांना संपुर्ण सहकार्य केले जाईल अशी माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय सागरी नियोजनाची गरज

दरम्यान, जुलै महिन्यात ईद गुल नामक एका अफगाणी नागरिकाला या ठिकाणहून पोलिसांनी अटक केली होती. शिपयार्डच्या परिसरातून ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीचा व्हिजा संपलेला होता.

loading image
go to top