Cockroach Janata Party
esakal
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच तरुणांच्या आंदोलनातून पुढे आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही संघटना आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाही, तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबाही देणार नाही, अशी घोषणा पक्षाचे संयोजक अभिजीत दिपके यांनी केली आहे.