Cockroach Janata Party
esakal
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच अभिजीत दीपके यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी'नेही आपली संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या संघटनेने उत्तर प्रदेशसह देशातील १० राज्यांमध्ये प्रभारी नियुक्त केले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १६ जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.